← मराठी वारसाOTT
महाराष्ट्रधर्म
महाराष्ट्रधर्म खा. डॉ. अमोल कोल्हे · मराठी वारसा
Watch Now ↗ 💬 WhatsApp: 84336 52648
भाग क्रमांक २ ← सर्व भाग यादी

हजारोंमध्ये एकाची निवड…तरीही लाखो तरुण याच परीक्षांच्या मागे का?

📌 विषय: हजारोंमध्ये एकाची निवड…तरीही लाखो तरुण याच परीक्षांच्या मागे का?
📺
प्रसारण (YouTube): शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ · रात्री ८:०० वाजता
🎙️
सूत्रसंचालन: खा. डॉ. अमोल कोल्हे

भागाची पार्श्वभूमी व वास्तव

✍️ या भागावर मत / पुरावे पाठवा

स्पर्धा परीक्षा हे स्वप्न आहे की तरुणाईला अडकवणारे चक्रव्यूह?

महाराष्ट्रात दरवर्षी लाखो तरुण-तरुणी पुण्याच्या पेठांमध्ये १६-१६ तास अभ्यास करतात. घरची परिस्थिती बदलण्याची जिद्द, आई-वडिलांचे स्वप्न आणि लाल दिव्याच्या गाडीचे आकर्षण यामागे असते. पण हजारो जागांसाठी लाखो अर्ज येत असताना यशाची टक्केवारी नेमकी किती? वारंवार होणारी पेपरफुटी, रखडलेल्या मुलाखती आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे तरुणाई आज कोणत्या मानसिकतेतून जात आहे?

'महाराष्ट्र धर्म'च्या या दुसऱ्या भागात आपण प्रशासकीय तज्ज्ञ, करिअर काउन्सिलर, प्रत्यक्ष अभ्यास करणारे विद्यार्थी आणि या संघर्षात होरपळलेल्या कुटुंबीयांशी संवाद साधून या गंभीर समस्येचा धांडोळा घेतला आहे.

या भागात काय पाहायला मिळेल?

▶️स्पर्धा परीक्षांची खरी आकडेवारी आणि वास्तव
▶️महेश झगडे (माजी सनदी अधिकारी) व विवेक वेलणकर यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
▶️स्पर्धा परीक्षा 'प्लॅन ए' असावा की 'प्लॅन बी'?
▶️पेपरफुटी आणि प्रशासकीय अनास्थेवर थेट सवाल
▶️कै. स्वप्नील लोणकर यांच्या वडिलांचे डोळ्यात पाणी आणणारे मनोगत
▶️स्पर्धा परीक्षांनंतर यशस्वी व्यावसायिक वाट निवडणारे वसंत देवकर यांचा प्रेरणादायी प्रवास

हा भाग महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने आणि त्यांच्या पालकांनी नक्की पाहावा असा आहे.

00:00 - प्रस्तावना: स्पर्धा परीक्षांचे चक्रव्यूह आणि तरुणाईचा संघर्ष
03:35 - पुण्याच्या अभ्यासिकांमधील वास्तव व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या व्यथा
10:05 - सरकारी नोकरीची सुरक्षितता की मृगजळ?
13:40 - महेश झगडे व विवेक वेलणकर यांच्याशी चर्चा: उपलब्ध संधींची खरी आकडेवारी
21:38 - स्पर्धा परीक्षा 'प्लॅन ए' की 'प्लॅन बी'?
23:25 - केंद्रीय परीक्षांचे (SSC, Banking, Railway) दुर्लक्षित पर्याय व CSAT चे महत्त्व
27:32 - पेपरफुटीची समस्या, व्यवस्था आणि प्रशासकीय सुधारणांची गरज
31:05 - अटेम्प्ट्सची मर्यादा (One Plus Syndrome) आणि वेळेत निर्णय
34:50 - कै. स्वप्नील लोणकरच्या संघर्षाची व्यथा
37:30 - स्वप्नील लोणकर यांच्या वडिलांचे डोळ्यात पाणी आणणारे मनोगत
46:50 - पुण्यातील विद्यार्थ्यांचा ग्राऊंड रियालिटीवर थेट संवाद (मानसिक आरोग्य व पेपर लीक)
54:30 - एमपीएससी/यूपीएससी कोचिंग क्लास इंडस्ट्रीचे वास्तव
01:04:40 - यशोगाथा 'प्लॅन बी'ची: वसंत देवकर यांचा प्रेरणादायी व्यवसाय प्रवास
01:06:35 - सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग: मार्ग बदलण्याचे धाडस
01:09:40 - समारोप: 'महाराष्ट्र धर्म' संदेश व आभार


📢 मालिकेसंदर्भातील सर्व नवीन अपडेट्स, विशेष घोषणा, प्रोमो, पडद्यामागील क्षण आणि महत्त्वाची माहिती सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आम्हाला सोशल मीडियावर Follow करा.

👉 Facebook | Instagram | YouTube | WhatsApp Channel

Instagram
https://www.instagram.com/marathi_warasa?utm_source=ig_web_button_share_sheet&igsi=ZDNlZDc0MzIxNw==

Facebook
/ https://www.facebook.com/MarathiWarasa

Twitter (X)
https://x.com/MarathiWarasa

Youtube
/https://www.youtube.com/@UCGrio5cB1us2UfymVKwtEdA

Website
https://www.marathiwarasa.com/

Whatsapp
https://whatsapp.com/channel/0029Vb8Y.....



🔔 मराठी वारसा चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतिहासातील अशा प्रेरणादायी घटनांचा प्रवास आमच्यासोबत अनुभवत राहा.

वारसा संस्कृतीचा, इतिहासाचा, मराठी मुलखाचा!

©️Rudraadya Entertainment LLP All Rights Reserved.

#mpsc #UPSC #MaharashtraDharma #AmolKolhe #MarathiWarasa #MPSCAspirants #CompetitiveExams #MaharashtraYouth #SwapnilLonkar #careerguidance #महाराष्ट्रधर्म #मराठीवारसा #स्पर्धापरीक्षा #MPSC #UPSC #विद्यार्थी #पेपरफुटी #बेरोजगारी #शिक्षणव्यवस्था

💬 प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया (0)

अजून प्रतिक्रिया नाहीत — पहिली प्रतिक्रिया तुमची असू द्या!

तुमची प्रतिक्रिया लिहा

संवेदनशील माहिती किंवा पुरावे असतील तर ते इथे नाही, गोपनीय पुरावे पाठवा या पानावरून पाठवा.

WhatsApp